महाराष्ट्र

हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करा…

समाजात द्वेष पसरवणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगीच कशी दिली?

मुंबई: मुंबईत २९ जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

हुसेन दलवाई यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या बॅनरखाली कार्यक्रम आयोजनामागे सकल हिंदू समाज आणि त्यांच्या घटक संघटना हे काम करीत असतात. मुंबईत दादरच्या मोर्चामध्ये तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि बाहेरुन आलेले कोणी आमदार यांनी देखील भाग घेऊन समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. समाजात इतका द्वेष पसरवणारे कार्यक्रम ताबडतोबीने रोखणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित, मुस्लिम, कुणबी आणि इतर निरनिराळ्या ओबीसी जाती यांना सामावून घेवून अतिशय आदर्श असे राज्य निर्माण केले, त्या शिवाजी महाराजांचे नाव घेऊन समाजात द्वेष पसरवल्यामुळे त्यांची देखील बदनामी केली जात आहे. हे सर्व दिसत असताना मुंबई पोलीसांनी मात्र मोर्चाला परवानगी दिली व बघाची भूमिका घेतली. महाराष्ट्राची परंपरा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची आहे. त्या परंपरेला तडा जाणारी ही बाब असून यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे, असे दलवाई म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago