महाराष्ट्र

पत्रकार संरक्षणासाठी अधिवेशनात प्रभावी काम करण्याची ग्वाही; डॉ. नीलम गोऱ्हे

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुखांनी घेतली शिष्टमंडळासह विधान भवनात भेट 

मुंबई: राज्यात पत्रकारांवर होणारे विविध ठिकाणचे हल्ले, पत्रकारांना काम करताना जाणवत असलेली असुरक्षितता, त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात काम करता येईल. यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्रित या माहिती द्यावी, ज्यायोगे या प्रश्नाला न्याय देता येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सांगितले.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद बाबळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आज नीलम ताईंची विधान भवनात भेट घेतली आणि याबाबत निवेदन दिले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘पत्रकारांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयी सुविधा होणे गरजेचे आहे. अनेक पत्रकारांना विशेषत: ग्रामीण भागामध्ये काम करताना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागतो. या अनुषंगाने त्यांच्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू करणे, या बरोबरच अन्य सोयी सुविधा कशा देता येईल, यासाठी काम होणे आवश्यक आहे.

आजवरच्या झालेल्या पत्रकार हल्ल्यांबाबत तपास आणि आरोपींवर कठोर कारवाईची जबाबदारी विवक्षित पोलिस महानिरिक्षक यांच्याकडे देण्यात यावी. विविध ठिकाणचे पत्रकार हल्ले आणि त्यांच्याबाबत सुरू असलेल्या केसेस विषयी सविस्तर माहिती देण्यात यावी. आरोपींवर कारवाई झाली की नाही याबाबत माहिती द्यावी. आवश्यकता भासल्यास पत्रकारांच्या विषयात लक्ष घालण्यासाठी राज्य सरकार सोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत विशेष बैठक घेण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या या प्रतिसादाने पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे मत या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

4 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

15 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

15 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

19 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

19 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

19 तास ago