महाराष्ट्र

सौर प्रकल्पासाठी वृक्षतोड; सांगलीत लोकशाहीच्या उत्सवावर बहिष्कार

तासगावच्या बलगवडे गावात दुपारपर्यंत एकही मतदान नाही

मुंबई: एकीकडे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह दिसत असताना, तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांनी मात्र लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गावात उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बलगवडे गावाच्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून जपलेल्या सुमारे साडेबारा हजार झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही वृक्षतोड बेकायदेशीर असून यामुळे गावातील पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

दुपारपर्यंत एकही मत नाही

बलगवडे गावाची एकूण मतदारसंख्या सुमारे २३०० इतकी आहे. प्रशासनाकडून दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सौर प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून संपूर्ण गावाने बंद पाळत मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होऊनही दुपारपर्यंत एकही मतदार मतदानासाठी केंद्रावर न आल्याचे चित्र होते. मतदान केंद्रांवर केवळ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रकल्प गावाबाहेर हलवण्याची ठाम मागणी

“आम्ही पर्यावरण रक्षणासाठी स्वतः झाडे लावली, त्याच झाडांची सरकारी प्रकल्पासाठी कत्तल करण्यात आली. त्यामुळे हा सौर ऊर्जा प्रकल्प गावातून तात्काळ हटवून अन्यत्र हलवावा,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.एकीकडे शासन वृक्षारोपणाचा संदेश देत असताना, दुसरीकडे सरकारी प्रकल्पासाठीच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago