महाराष्ट्र

मुंबईकरांच्या खिशावरचा डल्ला आम्ही सहन करणार नाही

मुंबई: मुंबईची शान आणि सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेली बेस्ट आज गंडांतराच्या उंबरठ्यावर उभी आहे.

पालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे बेस्टच्या भाड्यात थेट दुप्पट वाढ करण्यात आली आहे, आणि तीही केवळ काही मोजक्या कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी!

मुंबईकरांचे खिसे रिकामे करायचे आणि ठराविक कंत्राटदारांची खाती भरायची, असा स्पष्ट अजेंडा पालिका प्रशासनाने उघडपणे स्वीकारल्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे.

सरासरी तिकीट व मासिक पासांचे दर दुप्पट करण्याचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या बेस्टवर थेट आर्थिक आघातच केला आहे.

आता या दरवाढीला समर्थन द्यायचं म्हणून सांगितलं जातंय, “आर्थिक तोटा झाकण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे!”

असेल तर मग, बेस्टच्या तिकीट काढताना थेट बँक लोनही मंजूर करायला एखादा काउंटर उघडावा, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी लगावला आहे.

महागाईच्या प्रचंड तडाख्याने होरपळलेल्या सामान्य मुंबईकरांवर बेस्टच्या दरवाढीचा आणखी एक बोजा लादण्याचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे.

पालिकेच्या अपयशाची किंमत भरण्याची जबाबदारी मुंबईकरांवर कशी टाकली जाऊ शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बेस्ट ही केवळ एक लाल बस नव्हे, ती आहे – प्रत्येक मुंबईकराच्या संघर्षाची, स्वप्नांची आणि धडपडीची साथीदार!

आज त्या साथीदारावरच गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वस्वी निषेधार्ह आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबईच्या वतीने आम्ही स्पष्ट इशारा देतो

जर हा अन्यायकारक दरवाढीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला नाही, तर मुंबईभर जोरदार व अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.त्या आंदोलनाच्या प्रचंड जनआक्रोशामुळे पालिका प्रशासनालाही लवकरच लोन काढण्याची वेळ येईल, असा ठाम इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

मुंबई वाचवायची आहे,

बेस्ट वाचवायची आहे,

सर्वसामान्यांचा खिसा वाचवायचा आहे.

बेस्ट वाचवा! खिसा वाचवा! मुंबई वाचवा

जय मुंबई! जय महाराष्ट्र

ॲड. अमोल मातेले

मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago