शिरूर तालुका

शिक्रापूरच्या संतोष काळेंनी लिहिल्या स्वलिखित १२१ कविता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकास शालेय जीवनापासून लिखाणाची आवड असून शालेय जीवनात त्याने दहा ते बारा ग्रंस्थ स्व हस्ताक्षरात लिहिलेले असून सध्या त्याने स्वलिखित 121 कविता लिहिल्या आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकाला शालेय जीवनापासून लिखाणाची व वाचनाची आवड आहे. शालेय जीवनात देखील अनेक कथा, कविता लिहित त्याने काही ग्रंथ देखील स्व अक्षरात लिहून काढलेले आहेत.

काही दिवसांपूर्वी आलेल्या कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये मिळालेल्या वेळेचा संतोष ने सदुपयोग करत काही कविता लिहिण्यास सुरवात केली. त्यातून त्याने राजकारण, कोरोना, सामाजिक, धार्मिक, युवक, आई वडील, मित्र यांसह आदी विषयांवर आधारित तब्बल 121 कविता लिहिल्या आहेत.

पुढील काळात संतोष त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याने लिहिलेल्या कवितांवर आधारित पुस्तकाची निर्मिती करणार असून नुकतेच त्याने प्रसिद्ध लेखक प्रा. कुंडलिक कदम यांची भेट देखील घेतली असल्याचे संतोष काळे यांनी सांगितले, तर संतोष काळे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

2 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

2 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

2 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

3 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

3 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

16 तास ago