शिरूर तालुका

लग्नाआधी लोकशाहीच कर्तव्य! शेरवानीत नवरदेव थेट मतदान केंद्रावर

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली.

कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या नवरदेवानी मतदान केले. सायं सहा वाजता स्वतःचं लग्न असतानाही आणि घरात लग्नाची लगीनघाई असतानाही वेळात वेळ काढून आपल्याला घटनेनं दिलेला मतदानाचा अधिकार प्रथम बजावायचा, असा मनोदय नवरदेवनं केला आणि त्याप्रमाणं लग्न मंडपात जाण्याआधी वेशभूषा परिधान करून,हा नवरदेव मतदानासाठी हजर झाला.

दरम्यान, रांजणगाव – कान्हूर गटातील येथील निवडणूक ही संवेदनशील म्हणून परिचित असताना एका-एका मतदानाचा हिशोब लावला जात आहे. अशा परिस्थितीत हे मतदान झाल्यानं या घटनेची चर्चा कान्हूर मेसाई येथे घडून आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago