शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शनिवार (दि. १०) सप्टेंबर रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी दिली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी तसेच कामगारांचे प्रश्न समजून घेत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कामगारांसह शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी यांचे प्रश्न तसेच सध्याचे बदलते कामगार विरोधी कायदे याबाबत यशवंत भोसले सदर मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेची पुढील दिशा काय असणार याबाबत देखील राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले चर्चा करणार आहेत, तरी सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगारांना सदर मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी केले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…