Ghodganga
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असुन या निवडणूक प्रक्रियेत २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी शुक्रवार (दि.१ ) रोजी पार पडली. यामध्ये आमदार अशोक पवार, सुजाता पवार, ऋषिकेश पवार यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा पाटील फराटे, काका खळदकर यांच्यावर हरकती घेण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरु होती. त्यानंतर या दोन्ही गटाबाबत निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज सोमवार (ता. ४) रोजी कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, घोडगंगा किसान क्रांतीचे प्रमुख दादा पाटील फराटे यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर घोडगंगा किसान क्रांतीचे काका खळदकर यांनी घोडगंगा कारखान्याला तीन वर्षे ऊस देणे बंधनकारक असताना दोनच वर्षे ऊस दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी हा निर्णय जाहीर केला.
शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवार (ता. ४ ) रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर खालील गटात अर्ज वैध ठरविण्यात आले.
मांडवगण फराटा गट – १४, इनामगाव -११, वडगांव रासाई -१२, न्हावरे-१५,तळेगाव ढमढेरे – २४,शिरूर – १३,संस्था ब गट -२, अनु जाती जमाती – ४, महीला – १६,इतर मागास प्रवर्ग – १०,भटक्या विमुक्त जाती जमाती – ११ असे मिळून १३२ अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी दिली.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गेले २५ वर्षे कारखान्याच्या सत्तेवर आहेत तरी देखील व्यंकटेश कृपा हा खाजगी कारखाना घोडगंगाच्या कार्यक्षेत्रात नातेवाईकांच्या नावावर उभारला आणि तेव्हापासून घोडगंगा कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून खाजगी कारखान्यासाठी १०० कोटींचे कर्ज काढले असुन ते कर्ज त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने काढलेले आहे. तरीही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरविला असा आरोप ॲड.सुरेश पलांडे यांनी केला असून या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
याबाबत घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांना संपर्क साधला ते म्हणाले, पाच वर्षापुर्वी राज्यात भाजपाच सरकार होत. त्यावेळी घोडगंगा कारखान्यात आमचे २१ आणि विरोधकांचे ० अशी सत्ता आली होती. तालुक्यातील सगळ्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य जनता माझ्या बाजुने आहेत. प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक घोडगंगा कारखान्याच्या नावाखाली मला कायदेशीर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी कायद्याचा आदर करणारा व्यक्ती असुन न्यायालयाचा जो निकाल असेल तो मला मान्य असेल.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…