पार्टनरसोबत वॉक करण्याचे फायदे:- जर तुम्ही रोज पार्टनरसोबत वॉक करत असाल तर याने तुम्हाला मोटिव्हेशन मिळतं. खासकरून जेव्हा तुम्ही वॉकची नव्याने सुरूवात करत असाल तर याने तुम्हाला पुढील प्रवास चांगला करण्यास मदत मिळते.
वयोवृद्धांसाठी कोणता वॉक सुरक्षित:- रोज वॉक करताना सरक्षेची देखील काळजी घेणं आवश्यक असतं. जास्त वय असलेल्या लोकांनी नेहमीच पार्टनरसोबत वॉक केलं पाहिजे. याने तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि न घाबरता तुम्ही वॉक करू शकाल.
आत्मविश्वास वाढतो:- मोकळ्या हवेत वॉक केल्याने शारीरिक रूपाने आपल्याला चांगलं वाटतं. सोबतच याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही चांगला प्रभाव पडतो. जर तुम्ही एखाद्या मित्रासोबत किंवा पार्टनरसोबत वॉक करत असाल याने तुमच्यातील बॉन्ड आणखी मजबूत होतो. काही लोकांसाठी एक्सरसाईज करणं फार अवघड असतं. अशात तुम्ही कुणासोबत वॉक करत असाल तर याने कंटाळाही येणार नाही आणि तुमचा वेळ सहज निघून जाईल.
कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी:- पार्टनरसोबत वॉक करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सगळ्यात आधी तर जास्त बोलणं टाळावं. कारण याने तुमचा श्वास भरून येतो आणि यामुळे तुम्ही लवकर थकाल. जास्त बोलचाल केल्याने तुम्ही वॉकवर व्यवस्थित फोकस करू शकणार नाही. त्यासोबतच तुम्हाला पार्टनरचा स्पीड मॅच करणंही अवघड होईल.
एकट्याने वॉक करणे:- एकट्याने वॉक करणं जास्त फायदेशीर ठरतं. एकटे असताना तुम्ही वॉकवर जास्त फोकस करू शकता आणि याने तुमच्या मेंदुवरही चांगला प्रभाव पडतो. पार्टनरसोबत वॉक करणं अनेकदा अवघड ठरतं. अनेकदा लोक बोलता बोलता आपला स्पीड कमी करतात आणि आरोग्याच्या दृष्टीने हे अजिबात बरोबर नाही.
(सोशल मीडियावरून साभार)