शिरूर तालुका

खिदमत फाऊंडेशन भीमरत्न पुरस्कार सन्मानित

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यात अनेक ठिकाणी दोन समाजामध्ये वादविवाद घडुन दोन्ही समाजामध्ये कटुता निर्माण होत आहे. मात्र याला अपवाद आहे शिरुर शहर… गेल्या अनेक वर्षाचा भाईचारा जपत येथील खिदमत फॉउडेशनने गेल्या 4 वर्षापासुन सर्व समाजाच्या उत्सवात एक होत कोरोना काळापासुन विविध उपक्रम हाती घेतल्याने त्यांना नुकताच भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

शिरुर शहरातील हाजी आसीफ शेख ,हाजी फारुख बागवान, हाजी मुश्ताक शेख, हाजी फिरोज बागवान, आबिद शेख, फारुख सांगलीकर यांनी मिळुन हे खिदमत फाउडेशन सुरु केले. याबाबत या फाउडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख यांनी सांगितले कि समाजातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेउन हे खिदमत फाउंडेशन काम करत असुन कोरोना काळात खऱ्या अर्थाने गरजुना अन्नधान्याचे किट वाटप करुन आरोग्य शिबीर तसेच दर वर्षी ८० गरजु कुटुंबाना एक महिन्याला पुरेल एवढा अन्नधान्य किट वाटप कोरोना काळापासुन सुरु केले असुन तसेच 3 वर्ष रमजान ईद निमित्त २०० जणाना किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. तसेच आरोग्य शिबीर घेत चाळीस रुग्णांचे मोफत मोतीबिंदु ऑपरेशन करण्यात आले.

शिवजयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान पाणी वाटपही करण्यात आले. नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिरुर शहरात फ्रुट चे वाटप करण्यात आल्याचे शेख यांनी सांगत कोरोना काळापासुन फाउंडेशनने रुग्णासाठी बेड, व्हील चेअर, ऑक्सीजन तसेच इतर आरोग्य सेवा मोफत पुरवत असल्याचे शेख यांनी सांगितले.

शासकिय मतिमंद शाळेत २१ अनाथ मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले हे सर्व गोष्टी करत असताना समाजातील अनेक दानशुर व्यक्तीनी तसेच डॉक्टर, हॉस्पीटल, सामाजीक संस्था यांनी मदत केले असल्याचे शेख यांनी सांगितले.

शिरुर शहरातील मुस्लीम युवक एकत्र येउन चांगले काम करु शकतात हे खिदमत फाउंडेशनने दाखवुन दिले आहे. त्यांच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

15 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago