Vitthal Maruti Pawar
शिरूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी विठ्ठल मारुती पवार (वय १००) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
विठ्ठल मारुती पवार हे जुन्या पिढीतील शेतकरी होते. निमगाव म्हाळुंगी येथे त्यांनी आयुष्यभर शेती केली. त्यांचे दोन मुलगे दत्तात्रय पवार व बाळू पवार हे लष्करात मातृभूमीची सेवा करत होते. दत्तात्रय पवार यांचे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. बाळू पवार हे सुद्धा लष्करातून निवृत्त झाले आहेत. शिवाजी पवार हे शेती आणि दुग्ध व्यवसायात आहेत.
दरम्यान, विठ्ठल पवार यांचा दशक्रिया विधी शनिवारी (ता. १8) निमगाव म्हाळुंगी येथे सकाळी आठ वाजता होणार आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…