माहेर संस्थेकडून महिला दिनी पत्रकार पत्नींचा सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थामध्ये दरवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असताना परिसरातील पत्रकार पत्नींचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या माध्यमातून महिला सर्व कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत नविन आव्हानाला तोंड देवून अनेक क्षेत्रात ठसा उमटविणाचे कार्य करत आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान माहेर संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी केला जातो. महिला महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी व संस्थेतील ग्रूहमाता यांनी न्रुत्य सदर केले तर हर्षदा सोनके यामुलीने सावित्रीबाई फुले यावर एकांकीकां केली. दरम्यान परिसरातील पत्रकार यांच्या पत्नींचा तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बाल कल्याण समितिच्या डॉ. राणी खेडकर, वैशाली गायकवाड, आपटी च्या सरपंच सुनीता शिवले, आजाद समाज पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष दिपीका भालेराव, पोलीस पाटील सोनाली वाजे, पत्रकार पत्नी वैशाली शरद पाबळे, उर्मिला सुनील भंडारे, कावेरी शंकर पाबळे, हेमलता सुनील भांडवलकर, अनिता जाधव, बचत गट समन्वयक मंदा भोंडवे, अश्विनी बसवंती, कोमल माझंरे, नीता सूर्यवंशी, अनिता दुतोंडे, संगीता चौधरी, राणी साकोरे, इग्नेशीया व जर्मन स्वयंसेवक ऐना, वृषाली चव्हाण, स्वाती पाटील, नंदिनीताई, मिना भागवत, संध्या अडगळे, मनिषा शिंदे, निकिता वाटकर, आनंद सागर, राजेंद्र साकोरे, हरिश अवचर, प्रशांत गायकवाड, विष्णु सूर्यवंशी, सुमित इंगळे, विशाल सैंदाणे, संजय इंगळे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले तर प्रकाश कोठावळे यांनी आभार मानले.