माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या सभागृहात माहेर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माहेर संस्थेच्या मुलांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी खूप छान नृत्य सादर केले.

समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा माहेर संस्थेच्या सर्वेसर्वा लुसी कुरियन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिरुर येथील रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, महीला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा मीना कोरेकर, डॉ सुनीता पोटे, डॉ वैशाली साखरे, अ‍ॅड शोभा गायकवाड, शिक्षिका ललिता साखोरे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सालुबाई ढवण, महीला दक्षता समितीच्या सदस्या ललिता पोळ, शकीला शेख यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व महिलांनी लुसी कुरियन यांचाही सन्मान केला.

यावेळी बोलताना रामलिंग महीला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, बचत गटातील सर्व महिलांनी संघटित होऊन स्वतः साठी वेळ दिला पाहिजे. तसेच ज्या वेळेस आपण कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेर जातो. तेव्हा निश्चितच त्यातून शिकण्यासारखे खूप काही असते माहेर संस्थेचे कार्य खूप मोठे असुन या कार्यात आमचा नेहमीच खारीचा वाटा असेल.

यावेळी कार्यक्रमात बोलताना डॉ सुनीता पोटे यांनी जीवनात हसणे किती महत्वाचे आहे. याचे महत्व महिलांना समजून सांगितले. हसण्याला कारण पाहिजे असे नाही. नेहमीच हसले पाहिजे असे सांगत आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तीन बचत गटांनी आदर्श काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध खेळ घेऊन त्यांना बक्षीस देण्यात आले.

यावेळी शिरूर विभागाचे प्रमुख प्रफुल सरदार, वर्षा सरदार, विशाल, विजय तवर,रमेश चौधरी ,प्रकाश कोठावळे,मीना भागवत, मोनिका मोहिते, नेहा बांटे, रेखा झराड, सुनंदा सोनवणे, विविध क्षेत्रातील महिला मान्यवर तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंड तर आभार ललिता पोळ यांनी मानले