रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) सध्या सोशल मिडियाचा ट्रेंड असुन शाळकरी तसेच कॉलेजच्या मुलीं सोशल मिडीयावरील आभासी दुनियेत अडकून प्रेमाच्या जाळ्यात फसतात. परंतु मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना आणि समोर येणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा सामना करायला शिका असे प्रतिपादन पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक अनिता खेडकर यांनी केले.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कुल येथे सध्या देशात तसेच राज्यात महिला व मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटना लक्षात घेऊन मुलींसाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी खेडकर यांनी शाळेतील मुलींना महिला विषयक कायद्याविषयी माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्त्या विभावरी देव म्हणाल्या, वयात येणाऱ्या सर्वच मुलींनी आपल्या आईलाच आपली मैत्रीण बनवा. तुम्हाला शाळेत व कॉलेजमध्ये येणाऱ्या अडचणीबाबत आपल्या पालकांशी निसंकोचपणे बोला. तुम्हाला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर ती गोष्ट न घाबरता आपल्या पालकांना सांगा. प्रत्येक मुलीने झाशीची राणी होऊन स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे.
रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, तारुण्याच्या उंबरठ्यावर अनेक मुली मैत्री व प्रेम याकडे आकर्षित होतात. परंतु यातील फरक त्यांना समजत नाही. मैत्री करणे चांगले आहे. पण त्यात वाहवत जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. सोशल मिडीयाच्या आभासी जगात वावरण्यापेक्षा चांगला अभ्यास करुन स्वत:चे ध्येय साध्य करुन आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करा.
राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या शिरुर शहर युवती अध्यक्षा गिता आढाव म्हणाल्या, मुलींनो फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सऍप, शेअरचॅट यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर तासन तास फुकट वेळ घालवु नका. चांगला आहार घ्या, योग्य व्यायाम करा. त्यामुळे अभ्यासही चांगला होईल. या वयात स्वप्न नुसती पाहायची नसतात. तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवापाड मेहनत करायची असते.
यावेळी आठवी, नववी, दहावी या वर्गातील मुली उपस्थित होत्या. सध्या काळाची गरज ओळखुन प्रत्येक शाळेने मुलींसाठी जनजागृतीसाठी असा उपक्रम ठेवला पाहिजे असे मत काही पालकांनी व्यक्त केले. यावेळी महागणपती ग्रुप ऑफ स्कुलचे प्राचार्य डॉ विकास शेळके, श्रेयस कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या संगीता भुजबळ, कविता खेडकर, वंदना खेडकर, तसेच शाळेतील शिक्षिका नलावडे, शेख, गोळे तसेच मान्यवर उपस्थित होते.
जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…