मुख्य बातम्या

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यावर हल्ले होऊन मृत्यू होण्याची ही चौथी घटना असुन वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाय योजना करण्यात येत नसून वाढत्या बिबट संख्येला आळा घालण्यास शिरुर वनविभाग अपयशी ठरला असल्याचे दिसुन येते. या घटनेचा निषेध करण्यासाठी जांबुत ग्रामस्थांनी बस स्थानकावर बैठक घेऊन प्रशासनाचे विरोधात आज मंगळवार (दि २८) रोजी दुपारी रास्ता रोको करुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दुपारी हे आंदोलन होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

 

शिरुरच्या बेट भागातील एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यावर हल्ले झालेले आहेत. या हल्ल्यात चार जणांना आपला निष्पाप जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक प्रमाणात पशुधन धोक्यात आलेले असताना देखील ठोस उपाययोजना करण्याऐवजी वनविभाग प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे काय…? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित केला आहे.

 

वनविभाग पिंजरे लावण्यासाठी अथवा बिबट समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जर सर्वसामान्यांना शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कायदा दाखवत असतील तर अजूनही वनविभाग किती बळी जाण्याची वाट बघत आहे अशी खेदजनक भावना ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप यांनी व्यक्त केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जगताप यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून वनविभागाविरोधात जांबुत परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत.

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago