शिरूर तालुका

मोठा कट उघड! शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील पारोडी येथील वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्यासाठी तब्बल सहा दशकांपूर्वीच्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एकूण १३ जण आरोपी आहेत.

विशेष म्हणजे या कथित कटात येळे कुटुंबातील सदस्यांसह उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरूर येथील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील फिर्यादी पोपट गंगाराम येळे (वय ४८, रा. पारोडी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवतक्रार म्हाळुंगी येथील गट नं. १६ ही जमीन त्यांच्या आजोबा कृष्णा ऊर्फ किसन तात्या येळे यांच्या नावावर सन १९५७ च्या वाटपानुसार व १९६४-६५मधील एकत्रिकरण योजनेनुसार वैधरीत्या नोंदलेली होती. संबंधित जमिनीवर १९६६ ६७पासून सातत्याने ७ / १२ उताऱ्यावर फिर्यादी कुटुंबाचे नाव नोंदलेले होते. बँक कर्ज, वारस फेरफार व इतर अधिकृत नोंदींमधूनही हा हक्क निर्विवाद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, आरोपींनी संगनमत करून गट नं. १६ बाबत दि. १०जानेवारी १९६७ रोजीचा तथाकथित जबाब बनावटरीत्या तयार केल्याचा आरोप आहे. या खोट्या जबाबावर मयत कृष्णा तात्या येळे यांचा खोटा अंगठा उमटवण्यात आला असून पंच म्हणून दगडू बाबुराव पाटील यांची बनावट सही, तसेच सहाय्यक एकत्रिकरण अधिकारी ( ८३, पुणे) यांची खोटी सही व शिक्के लावण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. हा बनावट दस्तऐवज नंतर जिल्हा न्यायालय पुणे येथील अपिल क्र. ३३९/ २०२२ मध्ये खरा पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे…
सोपान विष्णू येळे (वय 78), 2) निवृत्ती विष्णू येळे (67), 3) चिंतामण विष्णू येळे (65), 4) सुदाम विष्णू येळे (60), 5) पांडुरंग विष्णू येळे (57), 6) अमोल चिंतामण येळे (45), 7) दिलीप निवृत्ती येळे (48), 8) अविनाश ऊर्फ बापू चिंतामण येळे (38), 9) प्रविण निवृत्ती येळे (37), 10) विशाल ऊर्फ बाबू पांडुरंग येळे (29), सर्व रा. येळेवस्ती, पारोडी, ता. शिरूर. तसेच 11) श्रीमती बेबीनंदा जयचंद्र शिंदे (शिपाई), 12) विनोद व्यंकटेश सूर्यवंशी (अभिलेखपाल) आणि 13) संतोष नामदेव काळाणे (परिरक्षण भूमापन) हे तिघेही उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरूर येथे कार्यरत कर्मचारी आहेत.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, भूमी अभिलेख कार्यालयातील मूळ एकत्रिकरण कागदपत्रे, खाते उतारे व जबाब पुस्तिकेतील पाने आरोपींनी संगनमताने नष्ट केली. या संदर्भात माहिती मागविल्यानंतर कार्यालयाने दि. ३१ जुलै २०२३ रोजी संबंधित जबाब अभिलेखात उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांचा संशय अधिक बळावला आहे.

या प्रकरणाची दखल घेत घोडनदी येथील ज्युडिशियल मजिस्ट्रेट (वर्ग- ०१) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भागवत करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक संदेश केंजळे हे मार्गदर्शन करीत आहेत.

जमीन व्यवहारांमध्ये शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांचे संगनमत, बनावट दस्तऐवज आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार असून, या प्रकरणातील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील अजून काही दस्ताऐवजांमध्ये काही फेरफार केला असल्याची दाट शक्यता नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

ZP निवडणुक; कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

शिरूर तालुक्यातील स्वयंघोषित नेत्याला कुणीतरी आवरा हो…? माजी सैनिकाचा संताप…

शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय उलथापालथ; राजकीय गणितांना मोठा धक्का…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

4 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

4 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago