रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री कोहकडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल (दि १७) रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच व उपसरपंच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार नवले, ग्रामपंचायत सदस्या जयश्री कोहकडे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री गणेश ताठे, राज्य परिषद सदस्या जयश्री पलांडे, पुणे शहर सरचिटणीस अनिल नवले पाटील, मंडल अध्यक्षा संयोगिता पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल पाचर्णे, शेखर पाचुंदकर, दत्तात्रय पाचुंदकर, सतिष पाचंगे, तुळशिदास दुंडे, मयूर गावडे, स्वाती पाचुंदकर, मनिषा पाचंगे, सागर देवकर आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मयूर कोहकडे, नवनाथ नवले, गणेश गवारे, रामदास कोहकडे, सुरज नवले, तुषार कोहकडे, सुर्यकांत कोहकडे, बालाजी नवले, सागर फलके, पंडित नवले, स्वप्नील फलके, राजवीर फलके, किरण फलके, नयन फलके, धनंजय फलके, सचिन फलके, तुकाराम फलके, रोहित नवले, शुभम फलके, सलमान शेख, नागेश बोह्राडे, अभिषेक नवले, नाथा गवारे, अक्षय सोंडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे जिल्हा अध्यक्ष प्रदिपदादा कंद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रवेशामुळे शिरुर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढवणार असुन त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुःखी ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा प्रवेश भाजपासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.