santosh-maharaj-khedkar

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपतीः भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, खंडाळे आणि पंचक्रोशी संचलित श्री क्षेत्र खंडाळे ते श्री क्षेत्र पैठण पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत एकनाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने पैठण क्षेत्रकडे प्रस्थान केले आहे. खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ संतोष महाराज खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.

श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज पालखी सोहळ्यात ४१ गावांमधून एकूण २३५ पायी वारकरी सहभागी झाले आहेत. पैठण येथे पालखी सोहळ्यास १४९ वारकऱ्यांनी एक दिवसीय भेट दिली आहे. शिरूर तालुक्यातील शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात पायी वारीचा आनंद घेत पालखी सोहळ्यात सहभागी होतात. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था, खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते.

संत एकनाथ महाराजांची चौदावे वंशज वंदनीय हभप श्री योगीराज महाराज गोसावी, पैठणकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली. महाराजांनी सकल संतांचा हा राजा/ स्वामी एकनाथ माझा// या संत निळोबारायांच्या अभंगावर मार्गदर्शन केले. वारकरी सांप्रदायाच्या अनेक कीर्तनकारांकडून संत एकनाथ महाराजांची जीवन चरित्र दुर्लक्षित राहत आहेत. महाराजांनी संत एकनाथ महाराजांचे वारकरी सांप्रदायाविषयीचे व सर्व जनसामान्यांसाठी केलेले अलौकिक कार्य वर्णन करत महाराजांनी संत एकनाथ महाराज व पैठण येथील एकनाथ षष्ठीच्या समाधी सोहळ्याचे महत्त्व कीर्तनामध्ये विशद केले.

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत