bapu-kale-nimgaon
पुणेः निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यामुळे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त भारत सरकार सूक्ष्म,लघु, एवंम मध्यम उदयम मंत्रालय या विभागात सह्याद्रीरत्न महाराष्ट्र राज्य या संस्थे मार्फत समाज, संस्कृती आणि त्यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगणाला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळया मध्ये निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार शरदचंद्र पवार यांना सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पहिली सही करणारे जेष्ठ माजी आमदार तुकाराम सावंत, लेखक समुपदेशक डॉ.संतोष मचाले, प्रसिद्ध उद्योजक नितीन धवणे, अभिनेत्री आर्या घारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपक जाधव या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
सरपंच बापूसाहेब काळे हे सरपंच झाल्या नंतर पहिल्याच दिवसापासून गावच्या विकासासाठी जे अहोरात्र झटत आहेत. गावातील ग्रामस्थांची सेवा हिच ईश्वर सेवा असे मानून सरपंच बापूसाहेब काळे हे जनतेच्या सेवेला भुकेलेले एक आदर्श सरपंच आम्हाला प्रेरणा देणारे वाटतात आणि म्हणून सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना आम्ही सह्याद्रीरत्न पुरस्कार देतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिपक जाधव यांनी व्यक्त केले.
पुरस्कार स्विकारल्या नंतर या पुरस्काराने नक्कीच माझ्या गावाला आनंद झाला आहे. परंतु, हा पुरस्कार ज्यांनी मला घडवलं असे माझे आई वडील, माझे गुरुजन वर्ग, माझा असणारा महाराष्ट्रातील मित्र परिवार, माझ्यावर प्रेम करणारा सर्व माझा चाहता वर्ग आणि माझ्या गावातील माझे सर्व ग्रामस्थ तसेच ज्यांनी मला योग्य न्याय दिला, असे माझे पत्रकार बांधव यांच्या आशिर्वादामुळे हा पुरस्कार मला मिळाला आहे. हा माझा एकट्याचा पुरस्कार नसून आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे हा पुरस्कार आपल्या सर्वांना मी माझ्या अंतःकरणा पासून समर्पित करत आहे. असाच कायम मला आपला आशिर्वाद मिळत रहावा, अशी प्रार्थना यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केली.
निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!
निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…
निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण
निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…
निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना
मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…
गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…
शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…