निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना

शिरूर तालुका

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जलदिंडी प्रतिष्ठान, साईक्रांती प्रतिष्ठाण तसेच शिवराज्य प्रतिष्ठाण यांच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्ष दत्तक योजना राबवण्यात आली आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने साईक्रांती प्रतिष्ठाण, शिवराज्य प्रतिष्ठाण व जल पर्यावरण समिती यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जलदिंडी प्रतिष्ठाण कडून आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हसत खेळत योग ही ५० पुस्तके शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आले.

यावेळी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच महेंद्र रणसिंग, उपसरपंच तनुजा विधाटे, शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब काळे, अहिल्यादेवी शाळेच्या पर्यावरण प्रमुख शिक्षिका शुभदा राजगुरु, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कृषी अधिकारी सदाशिव टिळेकर, अशोक शेंडगे, जलदिंडीचे विश्वस्त रावसाहेब निचित, भाजपा ओबीसी संघटनेचे शरद रासकर, नितीन चौधरी, राहुल चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे एकनाथ लांडगे, सोसायटीचे माजी चेअरमन दादाभाऊ काळे, मुख्याध्यापक मारुती निकम, अविनाश चव्हाण यांसह आदी ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर सर्वांनी वृक्षारोपण करतझाडे जगवण्याचा संकल्प केला. यावेळी रावसाहेब निचित व शुभदा राजगुरु यांनी मानवी जीवनामध्ये पर्यावरण काळाची गरज कशी आहे याचे महत्व पटवून दिले. तसेच विदयार्थ्यांसाठी नव्याने वृक्ष दत्तक योजना राबविण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती निकम यांनी केले, तर प्रास्ताविक बापूसाहेब काळे यांनी केले आणि सरपंच महेंद्र रणसिंग यांनी आभार मानले.