शिरूर तालुका

शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार खेळणारे व दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. यामुळे तेथे अस्वच्छता पसरली असून दशक्रिया साठी येणाऱ्या बाहेर गावाहून आलेले नातेवाईक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरूर नगरपालिकेने या प्रकाराची दखल घेऊन कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी कर्मचारी ठेवण्याची मागणी केली आहे.

शिरूर शहरातील कुंभारघाट येथे हिंदू धर्माचे दशक्रिया होण्यासाठी दशक्रिया घाट शिरूर नगर परिषदेने बांधला आहे. या ठिकाणी शिरूर शहरातील नागरिकांच्या दहाव्याचा विधी म्हणजेच दशक्रिया होत असतो. परंतु या घाटाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी रात्री दिवसा मोठ्या प्रमाणात तळीराम, पत्ते खेळणारे टुकार या ठिकाणी येत असतात. हे तरुण या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू पीत असतात व पिल्यानंतर या ठिकाणी या दारूच्या वाटल्या अस्तव्यस्त फेकून तर या परिसरात या बाटल्या फोडून संपूर्ण दशक्रिया घाटावर काचा केल्या जातात. सिगरेट ची पाकीट दारू पिण्याचे ग्लास , सिगारेट पाकीट ,चायनीज खरकटे, संपूर्ण परिसरात टाकून घाण केली जाते, तसेच मोठ्या प्रमाणात गुटखा खाऊन या परिसरातील फरशा हे तळीराम रंगवत असतात. या तळीरामांवर कुठलाही वचक शिरूर नगरपरिषद यांचा नसून, यामुळे हे तळीराम सोकावले आहे.

आपल्या नातेवाईकाता शेवटचा दशक्रिया विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांबरोबर नातेवाई व दशक्रिया असणाऱ्यांची जवळचे नाते यांना हा परिसर पाहून नाहाक त्रास होत आहे. शेवटचा विधी सुंदर चांगल्या जागेत व प्रसन्न ठिकाणी व्हावा त्या त्या ठिकाणी या परिसरातील महाराज यांचे कीर्तनही असते परंतु तळीरामाच्या या उच्छादामुळे हा परिसर घाण करून टाकण्याचे काम करण्यात आले आहे. 16 जुलै रोजी एका सर्वसामान्य आजींचा दहावा म्हणजे दशक्रिया विधी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. परंतु दशक्रिया विधीसाठी आलेले नातेवाईक व नागरिकांनी हा परिसर पाहून संताप व्यक्त केला यामुळे शिरूर नगर परिषदेबरोबर शिरूर शहराची नाचक्की झाल्यासारखे झाले आहे.

एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिलेचा दशक्रिया होता हा दशक्रिया अशा प्रकारे संपूर्ण परिसरात पडलेल्या काचांचा खच, दारूच्या बाटल्या, गुटखा खाऊन थुकलेला परिसर यामध्ये झाला. ही लोककुठे तक्रार करणार नाही. परंतु हा परिसर पाहून नातेवाईक व शहरातील काही सुज्ञ नागरिक मात्र खजील झाले आहे.

शिरूर परिषदेचे या ठिकाणची सुरक्षिता व स्वच्छता ठेवण्याचे काम आहे. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे या परिसरात खुलेआम पाणी तळीराम शहरातील टुकार जुगार खेळणारी तरुणांनी रात्रंदिवस खुलेआम हैदोस घातला आहे. यांच्यावर आळा बसवण्यासाठी पोलिसांची मदत घेऊन हा हिंदू दशक्रिया विधीघाटाला मोकळा श्वास घेऊ द्या अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिरूर शहरातील मद्यपी व्यसनाधीन दारू पिणारे पार्ट्या करणारे यांनी आपला अड्डा बनवला आहे. यामुळे परिसर दूषित झाला आहे. हिंदू समाजाचे पवित्र विधी दशक्रिया अशा जागेत होत असेल तर यासारखी लाजिरवाणी गोष्ट आम्हाला आणि नगरपरिषदेला नाही. या तळीरामाचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा. या ठिकाणी परगाव वरून आलेले नागरिक यांनी आज आमच्या समोरच आमच्या शहराची व नगरपरिषदेची धिंडवडे उडवले.

दशक्रियेसाठी शिरूर दशक्रिया घाटावर गेलो असता या ठिकाणचा परिसर पाहिला असता दारूच्या बाटल्या सर्व ठिकाणी फोडलेल्या दारूच्या बाटल्या, गुटखा खाऊन थुकलेले चित्र पाहून खूप दुःख झाले. हा दशक्रिया गरीब घरातील व्यक्तीचा असल्याने याकडे लक्ष दिले गेले नाही. परंतु असाच प्रकार राहिला तर नागरिकांनी दशक्रिया साठी कुठे जायचे हा प्रश्न पडतो.
– रणजित गायकवाड, माजी अध्यक्ष शिरूर नाभिक समाज

शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

शिरूर तालुक्यातील आनंद नागरी पतसंस्थेत तब्बल १७ कोटींचा अपहार; गुन्हे दाखल…

सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

5 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

5 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

5 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

5 तास ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

9 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

9 तास ago