suryakant-badhe-waghale
वाघाळे: विविध विकास कार्यकारी सोसायटीची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुर्यकांत बढे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार (ता. २९) सकाळी सोसायटी कार्यालयात संपन्न झाली.
वाघाळे विविध विकास कार्यकारी सोसायटी संस्थेचे 822 सभासद आहेत. संस्थेचे भाग भांडवल 3724790 रुपये असून संस्थेने 1/4/2023 ते 31/3/2024 अखेर 54223897 रुपये कर्ज वाटप केले असून संस्थेस निव्वळ नफा 1249956.44 रुपये एवढा झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सभासदांना लाभांश वाटण्यात आला नव्हता. या नवीन कार्यकारिणी काळात मागील वर्षी इमारत दुरुस्त करून या वर्षी सभासदांना 10% लाभांश वाटप करण्यास मंजुरी घेतली.
नवीन कार्यकारिणीने दोन वर्षांत खूप छान काम केले असून, त्याबद्दल सुरेश थोरात यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला व सर्वांनी एकमुखाने मंजूरी दिली. अहवाल छपाईचे सौजन्य उद्योजक व संचालक वैभव गावडे यांनी केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेस लहू थोरात, तुकाराम भोसले, सुरेश थोरात, देवराम थोरात, बाळासाहेब बढे, गोरखनाथ गायकवाड, जयेंद्र सोनवणे, वसंत शेळके, सखाराम शेळके, किसन गोरडे, आनंदराव सोनवणे, दशरथ कारकुड आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन माजी चेअरमन दिलीप थोरात यांनी केले तर आभार सोसायटीचे सचिव उत्तम थोरात यांनी मानले.
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!
वाघाळे येथील लहू थोरात यांची मतदार प्रतिनिधी पदी निवड!
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…