bharari-mahila-gramsabha

वाघाळे गावातील भरारी महिला ग्राम संघाचे उद्घाटन संपन्न!

शिरूर तालुका

वाघाळेः महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत व महिला सशक्तिकरणासाठी स्थापन झालेल्या वाघाळे गावातील भरारी महिला ग्राम संघाचे उद्घाटन शनिवारी (ता. २९) संपन्न झाले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भरारी महिला ग्राम संघाला तीन लाख रुपये जमा झालेल्या cif निधीचे वाटप जिल्हा परिषद सदस्य व श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वाती पाचुंदकर, वाघाळे गावच्या सरपंच नलिनी थोरात, खंडाळे गावच्या सरपंच कविता खेडकर, तालुका व्यवस्थापक शिल्पा ब्राह्मणे, प्रभाग समन्वयक सौ. सोनल, श्री नरके यांच्या हस्ते गटातील महिलांना चेक वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, हरिता कंपनीच्या उषा थोरात, सौ. गुंड, सीआरपी प्रमिला गायकवाड, अंजली पाचुंदकर, सौ. ढंम, सौ. ज्योती, सौ. दरवडे, वाघाळे गावातील सर्व बचत गटाच्या अध्यक्ष सचिव व गटातील महिला सदस्य उपस्थितीत होत्या.
भारती थोरात यांनी सूत्रसंचालन तर सीआरपी कविता धायबर यांनी प्रस्तावना केली.

विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप थोरात व माजी सरपंच पप्पू भोसले यांनी शुभेच्छा व्यक्त दिल्या. भरारीग्राम संघाचे अध्यक्ष सुवर्णा गायकवाड यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन दिपाली गोरडे, कल्याणी गायकवाड, सीमा जगताप यांनी केले होते.