waghale-yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!

मुख्य बातम्या शिरूर तालुका

वाघाळे (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावामध्ये यात्रेनिमित्त पै-पाहुण्यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती गावच्या सरपंच नलिनी थोरात यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली.

वाघाळे गावच्या विद्यमान सरपंच नलिनी स्वप्नील थोरात यांच्या अध्यक्षते खाली गावची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रविवारी (ता. १०) आणि सोमवारी (ता. ११) दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी कालिकामाता देवीची महापूजा, पालखी काढण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा आणि सोमवारी सकाळी हजेरी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी विविध गावांमधून नागरिकांनी तमाशाचा आनंद लुटला.

सोमवारी सांयकाळी चार वाजता कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यावेळी विविध ठिकाणांहून पैलवान गावात दाखल झाले होते. मुलीसुद्धा कुस्तीमध्ये सहभागी झाल्या होत्या. गावातील नागरिकांसह पाहुण्यांनी गाजलेल्या पैलवानांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद लुटला. सोमवारी सायंकाळी मायबोली लावण्य धमाका या आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आर्केस्ट्रालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

वाघाळे गावामध्ये यात्रेनिमित्त अनेक हॉटेलधारकांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध झाले होते. महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवस मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असेही सरपंच नलिनीताई थोरात यांनी सांगितले.

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

वाघाळे विविध विकास सोसायटी कडून सभासदांना दहा टक्के लाभांश!

वाघाळे येथे विकास सोसायटीच्या कार्यालयाचे उद्घाटन…