शिरूर तालुका

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांची वाढली धाकधूक…

शिरूर (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिरूर-हवेली मतदार संघासाठी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, वाघोली येथील ‘मयूरी गार्डन’ने माऊली कटके यांची धाकधूक वाढवली असल्याचे दिसत आहे.

वाघोली (ता. हवेली) येथील ०.४३ गुंठ्यात २०१४ मध्ये उभारलेल्या मयूरी गार्डन या गृहप्रकल्पातील सदनिका ग्राहकांना विकल्या. मात्र, खरेदी केलेल्या जागेचे हस्तांतरणच होत नाही. त्यामुळे संपूर्ण सोसायटीतील सदनिकाधारक धास्तावलेले आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या ४ ऑक्टोंबर २०२४ रोजीच्या अहवालात हे जमीन क्षेत्र जप्त झाल्याचा शेरा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सोसायटीधारक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते यांनी केली आहे.

काही सदनिकाधारकांनी नाव न छापण्याच्या अटीवर आणि गोते यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, रवींद्र जैन, अंकुश परांडे, पंढरीनाथ कटके हे आयर्न डेव्हलपर्सचे संचालक आहेत. या डेव्हलपर्सच्या माध्यमातून वाघोली येथील गट नं.११७३ मध्ये ज्ञानेश्वर कटके यांचे वडील पंढरीनाथ कटके यांच्या ०.४३ गुंठे क्षेत्रावर मयूरी गार्डन हा गृहप्रकल्प उभारून त्यातील सदनिका ग्राहकांना विकल्या. विकलेल्या सर्व सदनिकांमध्ये सर्व कुटुंबे राहावयास आली आहेत. मात्र, या प्रकल्पाची ०.४३ एवढ्या क्षेत्राची जमीन जी मयूरी प्रकल्पाच्या सोसायटीधारकांना हस्तांतरित व्हायला हवी, ती अद्यापही झाली नाही. उलट ही जमीन पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या ४ आक्टोबर २०२४ च्या अहवालानुसार बॅंकेकडून जप्त केल्याचा उल्लेख सोसायटी सदस्य तथा सदनिका धारकांना आढळल्याने सर्व रहिवासी धास्तावलेले आहेत. या सर्व सदनिका ग्राहकांची दिशाभूल करून विकल्या. दरम्यान या सदनिकांची मुळ जागा सोसायटीच्या नावे तत्काळ न झाल्यास ऐन निवडणुकीत आंदोलन करण्याचा इशाराही या सदनिकाधारकांनी दिला आहे.

ज्ञानेश्वर कटके यांच्या मालकीचे व वडिलोपार्जित अनेक शेतजमिनींवर शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेकडून जप्तीशेरा असल्याचे दिसून येत आहे. बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी २०१४ मध्येच कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गोते यांनी दिली.

दरम्यान, मयूरी सोसायटीत १ आरके, १ बीएचके आणि २ बीचके अशा सदनिका असून विकल्या गेलेल्या सदनिकांच्या किमती अनुक्रमे २२ लाख, २७ लाख आणि ३५ लाख अशा असल्याने संपूर्ण प्रकल्पाची किंमत ही करोडोंमध्ये आहे. मात्र, केवळ फ्लॅट देवून मुळ जप्तीची जमीन या प्रकल्पाला वापरल्याने प्रचंड संताप सर्व सदनिका धारक कुटुंबांकडून व्यक्त होत आहे. आम्हाला रस्त्यावर आणल्याच्या भावना व्यक्त होत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी संबंधित शासकीय यंत्रणेकडे तातडीने करीत असल्याचेही गोते यांनी सांगितले. यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मयूरी सोसायटीचा मुद्दा चर्चेत आला असून, ‘मयूरी गार्डन’ने माऊली कटके यांची धाकधूक वाढवली आहे.

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…

शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाळूमामा देवस्थानात 60.75 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल, तरी आरोपी फरार!

आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…

11 मिनिटे ago

पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’

‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…

15 मिनिटे ago

ब्लड कॅन्सरचे प्रकार व त्यावरील उपचार

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…

22 मिनिटे ago

रक्तदान करण्याचे फायदे, आरोग्याच्या दृष्टीने ब्लड डोनेशन ठरते फायदेशीर कसे ते जाणून घ्या…

एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे…

29 मिनिटे ago

तुम्ही गुडघेदुखीने त्रस्त आहात का चला तर मग हे काही घरगुती उपाय करा

दालचिनी, जिरे, आले आणि हळद यांचा वापर गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पदार्थांमध्ये…

32 मिनिटे ago

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

12 तास ago