शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेलीमधून अशोक पवार विरुद्ध माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके अशी लढत पाहायला मिळणार आहे. विरोधकांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे अशोक पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु खुद्द शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार असुन सरकार आल्यावर घोडगंगा कारखाना कसा चालु होत नाही ते मी बघतो असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात आता साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. परंतु माऊली कटके यांच्यापुढे महायुतीतील राजकीय नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच अपक्ष उमेदवार शांताराम कटके यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेताना ‘शांताराम कटके’ कोण आहे हे दाखवुन देऊ अस विधान करत माऊली कटके यांना ‘घरचा आहेर’ दिल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
माऊली कटके यांनी नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. शिरुर-हवेली मतदार संघात भाजपा कडुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, महायुतीच्या वतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला शिरुर-हवेली मतदार संघात जागा देण्यात आली. त्यामुळे अपक्ष म्हणून भरलेला अर्ज प्रदीप कंद आणि शांताराम कटके यांनी मागे घेतला आहे. पण, अर्ज मागे घेताना शांताराम कटके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या नाराजीचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला बसणार हे, पुढील काही दिवसांमध्येच समजू शकणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस न्हावरे येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतल्या भाषणात अशोक पवार यांना ‘तु आमदार कसा होतो’ असा दम दिला होता. त्यामुळे अशोक पवार यांना पराभुत करण्यासाठी अशोक पवार यांच्या सगळ्या राजकीय विरोधकांनी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके या उमेदवाराला पुढे आणले आहे. पण, त्यांच्या पुढे स्थानिक नेत्यांच्या तसेच महायुतीच्या नेत्यांच्या अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान असणार आहे.
महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके
ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…
शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?
शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी
विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?