शिरूर पोलिसांचा मानवतेचा चेहरा! शेतकरी महिलेसाठी नाथा जगताप ठरले ‘देवदूत’

शिरूर (अक्षय टेमगिरे): आधीच कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, एका शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांनी देवदूताची भूमिका बजावत मानवतेचे दर्शन घडवले आहे.

दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास कांदा विक्रीचे पैसे हरवल्यानंतर हवालदिल झालेल्या महिलेला अवघ्या दीड ते दोन तासांत तिची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून देण्यात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांना यश आले. त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मार्केट यार्डमध्ये कांदा विक्री करून मिळालेले पैसे पर्समध्ये ठेवून दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डकडून बसस्थानकाच्या दिशेने जात होती. शिरूर बसस्थानकासमोरील गतिरोधकाजवळ तिची पर्स दुचाकीवरून नकळत रस्त्यावर पडली. त्या पर्समध्ये कांदा विक्रीची रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.

दरम्यान, ती पर्स एका प्रामाणिक जोडप्याला सापडली. त्यांनी ती उचलून घेतली. पर्स हरवल्याची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून त्यांनी त्या जोडप्याचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधला.यानंतर संबंधित जोडप्याने प्रामाणिकपणा दाखवत सापडलेली पर्स शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केली.

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते ती पर्स संबंधित शेतकरी महिलेला परत देण्यात आली. तसेच प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या जोडप्याचे अभिनंदन करण्यात आले.अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या शेतकरी महिलेसाठी पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप हे अक्षरशः देवदूत ठरले असून त्यांच्या तत्परतेमुळे महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.या संपूर्ण घटनेमुळे शिरूर तालुक्यात पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

5 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

5 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

5 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

21 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago