क्राईम

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा पाय आणखी खोलात…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्टॅण्ड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपीने एका महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यानंतर आता दत्ता गाडे याच्या अडचणी वाढल्या असून या प्रकरणात पाय आणखी खोलात गेला आहे.

पुणे स्वारगेट बस स्थानकावर गेल्या काही महिन्यांपूर्वी एका शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी दत्ता गाडे याला शिरूर तालुक्यातील त्याच्या गुणाट गावातून अटक केली होती. त्यानंतर गाडे विरोधात 893 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने यापूर्वीही जामिनासाठी अर्ज केला होता, जो 30 जून रोजी न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याने पंधरा दिवसांतच पुन्हा दुसरा अर्ज दाखल केला.

या दुसऱ्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. त्यांनी आपल्या सात पानांच्या आदेशात स्पष्ट केले की, “आरोपीवर महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जामीन देण्यासारखी कोणतीही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे आरोपीला जामिनावर सोडता येणार नाही.” विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडित महिलेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद स्वीकारला आणि जामीन नाकारला.

दरम्यान, आता या प्रकरणातील आरोप निश्चितीसाठी पुढील सुनावणीला गाडेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खटल्याची सुनावणी लवकरच सुरू होईल. याआधीही आरोपीच्या वकिलांनी अनेक दावे केले होते, जसे की हा प्रकार “सहमतीने” झाला होता आणि बस स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी असे घडणे अशक्य आहे. मात्र, डीएनए आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांनी आरोपीच्या सहभागाची पुष्टी झाली आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, यापूर्वी आरोपीवर चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगसारखे सहा गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. या सर्व गोष्टी लक्षात घेता, गाडेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत वाढ…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! दत्ता गाडे आणि युवतीच्या संबंधाबाबत वकिलांचा दावा…

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

3 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

3 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

5 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

24 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

24 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

24 तास ago