वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) यशवंतराव चव्हाण तालुका कला क्रिडा स्पर्धा मंगळवार (दि २२) रोजी रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम प्रशाला येथे पार पडल्या .गेल्या आठ वर्षापासुन वाघाळे येथील शाळेच्या मुलांनी सतत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मुलींच्या संघाने सतत सहा वर्षे प्रथम क्रमांक मिळवून वाघाळे गावाचे नाव शिरुर तालुक्यात झळकवले आहे.

शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक आबासाहेब पाचुंदकर, गटविकास अधिकारी अजित देसाई, गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर , विस्ताराधिकारी खोडदे, रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर, शिक्षक नेते सुर्यकांत बढे, संतोष शेवाळे, दिपक सरोदे शशिकांत गावडे आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला . या विजयी स्पर्धकांस चषक सौजन्य शिरुर तालुका प्राथमिक पतसंस्थेचे विद्यमान संचालक कैलास गारगोटे व बबनराव म्हाळसकर यांनी केले.