इतर

तब्बल 6 फूट लांब केसांचा विक्रम; सुकन्येची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सांगली: मुळची सांगलीची सुकन्या श्रद्धा सुदर्शन सदामते हिला सन २००५ मध्ये एका अपघातामुळे केशवपन करावे लागले तीने आपले केस वाढवण्याचा विचार केला आणि तो जिद्दीने अंमलात आणत केसांना कधीही कात्री न लावता चांगले ६ फुट केस वाढवले. त्याच जिद्दीचे फळ म्हणून तिच्या 6 फुटी केसांची नोंद इंडिया बुकने ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली आहे.

सांगली विश्रामबाग येथे राहणारी श्रद्धा सदामते २०१२ पासून शिक्षण व लग्नानंतर पुण्यात स्थायिक आहे. त्यांचा विवाह हेमंत वाघमारे यांच्याशी झाला. सन २००५ साली अकरावीत असताना तिचा दुर्देवाने एसटी अपघात झाला. त्यातून ती थोडक्यात बचावली, पण मेंदूला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने तिची ब्रेन सर्जरी करण्यात आली. यामध्ये तिचें संपूर्ण केशवपन करावे लागले. दुखापत झाल्याच्या वेदनेसोबत ऐन तारुण्यात केस गमावणे हे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक होते. अशा अवस्थेत स्वत:ला स्विकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

दुखापत बरी होण्यासाठी बरीच वर्षे लागली. दीड वर्षे तिने आरसा पाहिला नाही. शारीरिकदृष्ट्या बरं होण्यासाठी तीन वर्षे लागली. पण गेलेला आत्मविश्वास मिळवायला बराच कालावधी लोटला. यावेळी घरच्यांनी तेव्हा दिलेला आधार आणि त्यांचं खंबीरपणे पाठीशी उभं राहणं हेच औषधाचं काम करत होतं. अशाही परिस्थितीतून पुढे हार न मानता तीने १२ वी नंतर आर्किटेक्चर ग्रॅज्युएशन सांगलीत केले. तर आर्किटेक्चर कोर्समधील मास्टर्स डिग्रीसाठी ती पुण्यास गेली. जवळजवळ १६ वर्ष एकेक एम-एम केस वाढताना ती बघत आलीय.

श्रद्धाला त्याचे फळ आता मिळाले असून, ६ फूट लांब केसांसाठी तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. भारतातल्या सर्वात लांब केस असलेल्या महिलांमध्ये तिचे नाव नोंद झाले आहे. तिची बहीण डॉ. पूजा सदामते- नागराल ही ‘हवा येऊ द्या-होवू द्या व्हायरल’ ची उपविजेती आहे. बहिणीसह आई लता सदामते, वडील सुदर्शन सदामते व माऊ श्रेयश यांचं पाठबळ तिला वेळोवेळी मिळत आहे. त्या बळावरच ती जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

21 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago