leopard koregaon bhima

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भर लोकवस्तीत तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला एका कंपनीच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर कोंडण्यात यश आले आहे. बिबट्याला वनविभागाच्या मदतीने जेरबंद करण्यात यश मिळाल्याने कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क, जवळील शेत, गोठ्या जवळ बुधवारी दुपारपासून तळ ठोकून असलेल्या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होती. सुदैवाने बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही.

संसार कंपनी जवळ सदर बिबट्या आला तेथे एका पीकअप गाडीच्या मागे बसला त्याच्या हालचालींवरून तो आजारी असल्याचे सांगितले जात आहे. तेथे कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थ जमा झाले होते. यावेळी बिबट्या एका खोलीत शिरला त्यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे नेते अनिल काशीद यांनी मोठे धाडस दाखवत खोलीची कडी लावली. गावातील संतोष साळुंखे, ॲड प्रताप साळुंखे, किरण साळुंखे व सिद्धार्थ काशीद यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला खोली बंद करण्यासाठी मोलाची मदत केली. बिबट्याला जेरबंद केल्यावर कोरेगाव भिमा ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.

यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य पि. के. गव्हाणे, माजी सरपंच अशोक काशीद, सामाजिक कार्यकर्ते संपत गव्हाणे, सुरेश शेवाळे, पोलीस मित्र खंडू चकोर, नितीन पोपट गव्हाणे, चेतन गव्हाणे, ग्राम सेवक रतन दवणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

शिरूर तालुक्याच्या बेट भागात तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी

तळेगाव ढमढेरेत धावत्या दुचाकीवर बिबट्याला हल्ला

शिरुर तालुक्यात ऊसतोडणी करताना आढळले ४ बिबट्याचे बछडे

पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार…

शिरुर तालुक्यातील जांबुत येथील तिसरा बिबट्या जेरबंद