क्राईम

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर तालुक्यातील छोटयाशा मिडगुलवाडी गावात नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने एका कंपनीवर छापा टाकला.या कारवाईत तब्बल एकशे चौऱ्याहत्तर किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पथकाने ही कंपनी सील केली असून परिरात खळबळ उडाली आहे.

मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने शिक्रापूर पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकला. ही कारवाई इतकी गोपनीय होती की यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तीस तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरु होती. या कारवाईने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आले आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये फारशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. शेड व कंपनी अतिशय जंगलात असल्याने कोणालाही काही माहिती नव्हती. नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील करण्यात आले आहे. या कारवाईत शेकडो लिटर केमिकल ओतून देत काही साहित्य जाळून नष्ट केले. तर त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयामध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून शेडच्या परिसरात उग्र वास येत आहे. मात्र सदर कारवाईने शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे? पुणे जिल्ह्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलेच तापले असताना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त केला गेल्याने या घटनेशी ललित पाटील चा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आह

मिडगुलवाडी ता. शिरुर येथे दुर्गम भागातील शेतात पत्र्याचे मोठे शेड व त्याला पत्र्याचे कंपाउंड मारून त्यामध्ये फारशी पुसण्याचे फिनेल बनवल्याने भासवून काही नागरिकांना फिनेल देऊ करत तेथे आतमध्ये चक्क अल्प्राझोलम ड्रग्ज बनवले जात असल्याचे समोर आले आहे. मिडगुलवाडीच्या शेजारी अनेक पत्रा शेड मिडगुलवाडी (ता. शिरुर) नजीक कान्हूर मेसाई, हिवरे कुंभार, खैरेवाडी, सविंदणे येथील अनेक ठिकाणी दुर्गम भागात कुदळवाडी भागातील अनेक व्यवसायिकांनी जागा खरेदी करत मोठमोठे पत्रा शेड मारून तेथे दुर्गम भागात व्यवसाय उभारल्याचे दाखवले आहे. त्याबाबत देखील आता शंका उपस्थित होत आहे. तसेच या परीसरातील अनेक डेअऱ्यामध्ये केमिकलयुक्त दुध, व केमिकल वापरून दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जात आहे. यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर तालुक्यात सरपण आणण्यासाठी गेलेल्या मुलींचा विनयभंग…

शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

12 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

13 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

6 दिवस ago