क्राईम

शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत खाते रिकामा करणाऱ्या पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांच्या तत्परतेमुळे जाळ्यात अडकला आहे.

शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत हातचलाखीने कार्डची अदलाबदली करुन पासवर्ड माहिती करून अकांऊट साफ करण्याच्या घटना शिरूर तहसिल कार्यालयासमोरील एस.बी.आय. बॅकेच्या एटीएम मध्ये वारंवार घडत होत्या. अशीच एक घटना २९ एप्रिल रोजी घडली होती. त्यामध्ये ३८,०००रू. रक्कम चोरानी हातचलाखीने काढून घेतली होती. त्या संदर्भात शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांनी सदर घटनेचे फुटेज सपांदन करून त्या आरोपीचा शोध घेणे सुरु असताना ७ ऑक्टोबर रोजी नाथासाहेब जगताप व पोलिस अंमलदार रघूनाथ हाळणोर हे शिरुर शहरात बाजाराच्या दिवशी गस्त घालताना एस.बी.आय. बॅकेच्या समोर सदर संशयित चोर वृद्ध नागरीकांची एटीएममध्ये जाण्याची वाट पाहत होता. फुटेजच्या आधारे सदर इसम संशयित वाटत असल्याने त्याची कसून चौकशी असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हातील रक्कमेची रिकव्हरी केली आहे.

एकाच ठिकाणी नागरीकांना हातचलाखीने लुटण्याच्या डाव महेश हनुमंत अडागळे (रा. खराडी, पुणे) याच्या अगंलट आला असून पोलिस नाईक नाथा जगताप यांच्या तीक्ष्ण, तल्लख नजरेने हेरून त्याला गजाआड केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.

एटीएम मध्ये पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तींना पासवर्ड माहीती होणार नाही याची दक्षता घ्यावी. पैसे काढताना अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये. विशेष करून शिरूरमधील एसबीआय बॅकेच्या एटी एममध्ये असे प्रकार वारंवार घडत आहे. वृद्ध व तरुण नागरीकांनी याबाबत दक्षता घ्यावी.
– पोलिस निरीक्षक संजय जगताप (शिरुर पोलिस स्टेशन)

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

4 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

4 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

5 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

7 दिवस ago