dp-robbery

शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन विद्युत रोहीत्रांवर चोरटयांचा डल्ला मारला असून, महिनाभरात ३ विदयुत रोहित्र फोडले आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शिरूर पोलिसांपुढे आव्हाण निर्माण केले आहे.

सविंदणे (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुर्वनरवडे मळा व हाडकी हाडवळा येथील असे दोन विद्युत रोहीत्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या आहेत. वीस दिवसांपुर्वी याच परीसरातील फटांगडे दरा येथील विद्युत रोहित्र फोडले होते. सविंदणे हद्दीतील ग्रामपंचायत गावठाण पाणीपुरवठा व कामठेवाडी, डोंगरभाग पिराचामाळ या ठिकाणी पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरी आहेत. सदर दोन्ही विहिरींचे विद्युत कनेक्शन असून त्याचे ट्रान्सफार्मर चोरी झालेमुळे गावठाण व इतर वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची पाण्याची अत्यंत गैरसोय होत आहे.

सदर घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून गुन्हेगारांचा शोध लावून त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरपंचांनी शिरूर पोलिस स्टेशनला लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच चांडोह परीसरातील घोडनदीकिनारी असलेल्या ६ ते ७ शेतकऱ्यांच्या विदुयत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी झाली आहे. एकूणच बेट भागात विदयुत रोहीत्र, केबल, विदयुत मोटार चोरण्याचा धुमाकुळ चोरट्यांनी घातला असून शिरूर पोलिसांपुढे आव्हाण निर्माण केले आहे.

तळेगाव ढमढेरेतील विद्युत रोहित्राच्या पट्ट्या चोरी

रोहित्र जळाल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करावा…

वढू बुद्रुक मधील विद्युत रोहित्रातील तांब्याच्या पट्ट्या चोरी

शिरुर तालुक्यात ड्रोनच्या सहाय्याने पकडली दोन कोटींची वीजचोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरची चोरी करणारी मामा टोळी जेरबंद…