datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत वाढ…

क्राईम

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका युवतीवर (वय २६) पहाटेच्या सुमारास बलात्कारची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. दत्ता गाडे याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तसेच दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध असण्याचा मुद्दा देखील खोडून काढण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ॲड. वाजेद खान बीडकर यांनी विविध न्यायनिवाड्यांचे दाखले देत हा बलात्कार नसून, सहमतीने झालेले संबंध असल्याचा दावा केला. विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.

सरकारी वकीलांनी युक्तिवाद केला की, आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध आणि तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केले आहेत. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गाडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या तपासात काही अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक पुरावे समोर आले आहेत. यात विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय आणि लोकेशन ट्रेसेस यांचा समावेश आहे. या पुराव्यांमधून असे समोर आले आहे की, आरोपी आणि पीडिता यांच्यात यापूर्वी कोणताही संपर्क नव्हता आणि त्यांच्यात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. विशेष सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी असाही युक्तिवाद केला की, आरोपीला जामिनावर सोडल्यास पीडितेच्या जीविताला धोका निर्माण होईल.

दरम्यान, दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर, जि. पुणे) हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी काही पथके तयार केली होती. मोठ्या कसरतीनंतर आरोपीला अटक करण्यात यश आले होते.

स्वारगेट बलात्कार प्रकरण! दत्ता गाडे आणि युवतीच्या संबंधाबाबत वकिलांचा दावा…

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

शिरूर तालुक्यात घडली धक्कादायक घटना; युवक, युवतीला मारहाण करत केला सामूहिक बलात्कार…