शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इकोग्राम सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना दोघा युवकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन संतोष खोमणे व सनी पाटील या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इकोग्राम सोसायटीचे सुरक्षा रक्षक अनिल सोनकुसरे हे सोसायटीच्या गेटवर असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतोष खोमणे सोसायटीमध्ये आले असताना त्यांना गेटचा धक्क्का लागल्याने संतोष खोमणे व सनी पाटील यांनी सुरक्षारक्षक सोनकुसरे यास शिवीगाळ, दमदाटी करत दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे दुसरे सुरक्षारक्षक दिपक तारू मध्ये आले असता त्यांना देखील मारहाण केली त्यानंतर काही नागरिक व सुरक्षारक्षक कंपनीचे मोहन राजगुरव सदर ठिकाणी आल्याने त्यांनी दोघा सुरक्षारक्षकांची युवकांच्या तावडीतून सुटका केली.
याबाबत अनिल गजानन सोनकुसरे (वय ४९) रा. तळेगाव रोड शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संतोष खोमणे व सनी पाटील दोघे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …