क्राईम

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर एका दुचाकीवर असणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अपघात झाला आहे. यामध्ये चारही अल्पवयीन मुले जखमी झाली असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

एक तीन चाकी मालवाहतूक रिक्षा आणि विद्यार्थ्यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला आहे. चारही अल्पवयीन मुले जखमी झाल्याने पुणे-नगर रस्त्यावर रक्तच रक्त सांडले होते, रिक्षाला रक्त लागले होते व दुचाकीची दुरावस्था झाली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी संबधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

कोरेगाव भीमा येथील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा पुणे-नगर महामार्गावर एका खाजगी शिक्षण संस्थेतील मुले दुपारी पुणे-नगर रस्त्यावर आज (रविवार) दुपारच्या वेळी ३.१५ मिनिटांनी एक तीनचाकी रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये शाळकरी अल्पवयीन मुले जखमी झाले. यावेळी नागरिकांनी संबधित विद्यार्थ्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करत उपचार सुरू केले.

चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा भीषण अपघात, रस्त्यावर रक्ताचा सडा, रक्ताने भरला शाळेचा गणेवश, रिक्षावर रक्ताचे डाग पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येत होता व एकच प्रश्न मुले कशी आहेत? काही झालं नाही ना? खूप लागलं असेल असा चिंताजनक प्रश्न विचारत होते यावरून सदर अपघाताची भीषणता व गंभीरता लक्षात येते. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. एकाच्या चेहऱ्याला मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापक व ग्रामस्थांनी तातडीने मदत करत मुलांना उपचार उपलब्ध करून दिले. याबाबत शाळा व्यवस्थापनाने कडक भूमिका घेत पालकांना मुलांना वाहन न देण्याची सूचना केल्या असून, असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलांना गाडी देण्यास नाही म्हणायला शिका…
विद्यार्थ्यांना झालेल्या अपघातानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे पालक गाडी देतात तरी कसे ? यावर कडक कार्यवाही व्हायला हवी, तसेच पालकांना समज द्यायला हवी. तात्पुरता मुलांचा लाड पालकांना आयुष्यभर पश्चाताप करायला लावू शकतो. अल्पवयीन मुलांना गाडी देण्याचे टाळायला हवे. एकदा दुर्घटना घडून गेल्यावर शोक संदेश देण्यापेक्षा आता मुलांना वाईट वाटले तरी चालेल पण वाहन देऊ नये. आजचा कठोर निर्णय उद्याचे दुःखद व शोक प्रसंग टाळेल याचे भान बाळगायला हवे.

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

कोरेगाव भीमा येथे मध्यरात्री स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

7 दिवस ago