मुख्य बातम्या

अशोक खरात प्रकरण! शिरूरच्या राजकीय नेत्याला काही अटी शर्तीवर तात्पुरता जामीन, पण…

शिरूर (तेजस फडके) : राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिनेश परब (मुंबई) आणि राजेंद्र जासूद (पुणे) या दोघांवर दि 29 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, नाशिक रोड यांनी राजेंद्र जासूद यांना तीन लाखांच्या बॉण्डवर काही अटी आणि शर्तींच्या आधारवर तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर आत्तापर्यंत नाशिक तसेच वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला सात गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेष पोलिस पथकामार्फत त्याची कसून चौकशी चालू आहे. तपासामध्ये रोज वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल (ता. 24) विधानसभेत याबाबत सविस्तर माहिती दिली. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडे राज्यातील अनेक राजकीय नेते आमदार मंत्री हे जात असल्याचे आता उघड होत आहे.

जासूद यांच्या समर्थनासाठी त्यांचे कार्यकर्ते मैदानात…
राजेंद्र जासूद यांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राजेंद्र जासूद यांच्यावर खरात याने खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाले. त्यानंतर राजेंद्र जासूद यांचे शिरुर तालुक्यातील काही कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकून जासूद यांनी भोंदूबाबा खरातचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून खरातने जासूद यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या पोस्ट करत आहेत.

मग जासूद यांनी ते आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांनी का दिले नाहीत…?
राजेंद्र जासूद यांनी भोंदू बाबा अशोक खरातचे बिंग फुटू लागल्यामुळे त्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्या असल्याची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली आहे. जर जासूद यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर मग जासूद यांनी त्यांच्याकडे असणारे भोंदूबाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना का दिले नाहीत. राजेंद्र जासूद जर निर्दोष असतील तर मग ते मिडिया समोर का येत नाहीत अशी सध्या शिरुर तालुक्यात सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

खालील अटींसह राजेंद्र जासूद यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
1) प्रत्येक सोमवार व शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान पोलीस स्टेशनला हजेरी लावावी.
2) फिर्यादी, साक्षीदार किंवा संबंधित व्यक्तींशी संपर्क साधू नये.
3) पुराव्याशी छेडछाड करु नये व तपासात सहकार्य करावे.
4) सक्रिय मोबाईल नंबर द्यावा व बदल झाल्यास कळवावे.
5) पासपोर्ट असल्यास एका आठवड्यात जमा करावा, नसल्यास शपथपत्र द्यावे.
6) गुन्ह्याशी संबंधित कोणतीही कृती करू नये.
7) स्थिर पत्ता ठेवावा व बदल झाल्यास कळवावे.
8) तीन रक्त नातेवाईकांचे पत्ते व तपशील सादर करावे.
9) न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाऊ नये.
10) प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे.
(क्रमश:)

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

शिरूरच्या राजकीय पुढाऱ्याकडून अशोक खरात अन् दोन आमदारांना आलिशान महागड्या गाड्यांची भेट…?

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

8 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

8 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

12 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

15 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

15 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

15 तास ago