चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; करंदी गावच्या हद्दीत ३ ते ४ वाहनांना कंटेनरची धडक

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कंटेनरने कारसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगतची काही दुकानांचे किरकोळ नुकसान झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, चाकण-शिक्रापुर मार्गावरील अवजड वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि वेगमर्यादेचा भंग यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची स्थानिकांची भावना आहे. वाहतूक नियंत्रण आणि गतिरोधकांची योग्य रचना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.