क्राईम

कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील इचकेवाडी हद्दीत इको गाडी व टु व्हिलर गाडीची समोरासमोर धडक झाली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी (ता. ०५) ७ वा. चे सुमारास कवठे येमाईतील इचकेवाडी येथील बस स्टॅन्ड जवळ पारगाव ते कवठे येमाई रोडवर दिपक येठेकर हा मोटार सायकल नं. एम. एच. 16. सी. आर. 7785 चालवित जेवणाचा डब्बा आणण्याकरता कामगार रंगनाथ बन्सी आढाव यांच्यासह जात होता. कवठे येमाई बाजूकडून पारगाव बाजूकडे राँग साईडने येणा-या इको गाडी नं.एम.एच.12.टी.डी.8718 वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील इको गाडी ही राँग साईडने भरधाव वेगात चालवल्यास त्यामध्ये एखाद्याचा अपघात होवून त्यामध्ये जिवीत हानी अगर मृत्यू होवू शकतो याची जाणीव असतानाही, इको गाडीवरील चालकाने त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगात, हयगयीने, निष्काळजीपणे, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवले.

दिपक येठेकर व त्याचे पाठीमागे बसलेला रंगनाथ बन्सी आढाव यांना समोरासमोर धडक दिली. त्यामध्ये दिपक येठेकर (वय 33, मु. पो. गुंडेगाव, ता. जि. अ. नगर) याचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. इको गाडी नं. एम. एच. 12. टी. डी. 8718 वरील अज्ञात चालकाविरूद्ध मयताचा भाऊ अमोल गोरक्ष येठेकर यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

Video; शिरुर येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago