क्राईम

शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…

शिरूर : जमिनीच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादातून सावत्र मुलाने आपल्याच वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे घडली आहे. मुलासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

संबंधित कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. वृद्ध महिला हक्काच्या जमिनीसाठी मागणी करत असताना सावत्र मुलाला ते मान्य नव्हते. वादाचे रूपांतर आज (मंगळवार) शिवीगाळीत झाले आणि संतापाच्या भरात सावत्र मुलाने आणि त्याच्या घरातील सदस्यांनी वृद्ध आईवर हल्ला केला. वृद्ध महिलेला नराधम मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिलेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गावकरीही हादरले आहेत.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

शिरूर! ‘सुलभ’ भिशी घोटाळा प्रकरणात संशयाचे सावट झाले गडद…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago