मनोरंजन

‘सनई चौघडे’ मालिकेतून चिन्मयी साळवीचा मराठी छोट्या पडद्यावर दमदार प्रवेश

मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात लवकरच ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेत काही नवे चेहरे झळकणार आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे अभिनेत्री चिन्मयी साळवी, जी मालिकेत ‘शर्वरी परब’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. बेधडक, स्पष्टवक्ती आणि बिनधास्त स्वभावाची शर्वरी ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहील, असा विश्वास चिन्मयीने व्यक्त केला आहे.

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना चिन्मयी म्हणाली की, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शर्वरी प्रमिला सुभाष परब आहे. शर्वरी ही अत्यंत निर्मळ, स्वच्छंद आणि आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ती आपल्या कुटुंबाशी खूप जोडलेली असून जशास तसे बोलणारी, स्पष्ट मत मांडणारी आहे. तिला पाठीमागून बोलणं अजिबात आवडत नाही. कुटुंबावर तिचा खूप जीव आहे. शर्वरी ही ग्रॅज्युएट मुलगी असून एम.डी.ची ‘रोज क्वीन’ आहे. ती नोकरीच्या शोधात असली तरी नोकरी मिळेपर्यंत आपल्या आईच्या टिफिन व्यवसायात मदत करत असते.”

या भूमिकेसाठी कॉल आल्यावर आपला आनंद गगनात मावेनासा झाल्याचेही चिन्मयीने सांगितले. “‘वागळे की दुनिया’ ही हिंदी मालिका तब्बल पाच वर्ष केल्यानंतर मला शर्वरीच्या भूमिकेसाठी कॉल आला. मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझी इच्छा होती की मराठी मालिकेत अशी भूमिका करावी जी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील,” असे ती म्हणाली. मालिकेत शर्वरी आणि जय ही दोन अगदी विरुद्ध स्वभावाची पात्रे असणार असून त्यांची भेट प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरेल, असेही तिने नमूद केले.

शर्वरीच्या भूमिकेसाठी फारशी विशेष तयारी करावी लागली नाही, कारण स्वतःचा स्वभावही त्या व्यक्तिरेखेसारखाच असल्याचे चिन्मयीने सांगितले. मात्र या भूमिकेसाठी तिने खास करून स्कूटी चालवायला शिकले. “शर्वरी आईच्या टिफिन व्यवसायासाठी स्कूटीवरून टिफिन डिलिव्हरी करते. मला आधी स्कूटी चालवायला भीती वाटायची, पण या भूमिकेसाठी मी स्कूटी शिकले आणि आता गर्दीतही आत्मविश्वासाने चालवू शकते,” असे ती हसत म्हणाली.

शूटिंगदरम्यानचा एक खास अनुभवही तिने सांगितला. हॉस्पिटलमध्ये शूटिंग सुरू असताना अचानक एका सुमारे पन्नास वर्षांच्या महिलेने पुढे येत चिन्मयीसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. प्रोडक्शन टीमने परवानगी दिल्यानंतर त्या महिलेने फोटो काढला आणि मालिकेच्या यशासाठी सर्व कलाकारांना मनापासून आशीर्वाद दिले. “शूटच्या पहिल्याच दिवशी असा सुंदर अनुभव मिळाला. तो मी कधीच विसरणार नाही,” असे चिन्मयीने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

10 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

11 तास ago