क्राईम

वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…

पुणे : वाघोली मधील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील २० वर्षी युवतीचे अहमदनगर येथील २१ वर्षी युवकाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र, वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्याने लॉजमधील कामगारांनी युवकाच्या मोबाईलवर संपर्क साधला. युवकाने फोन न उचलल्याने कामगार खोलीजवळ गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा दरवाजा बंद नसल्याचे लक्षात आले. दरवाजा ढकलल्यानंतर आत दोघांनीही गळफास घेतल्याचे दिसले. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, युवती डीएमएलटीचे शिक्षण घेत होती. तर युवक खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. अधिक तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत.

पोरींनो बाप आभाळ आहे ते कुठेही झुकता कामा नये…

शिरूर तालुक्यात मुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून आत्महत्या…

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago