शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी घडली. या प्रकरणी संशयितांवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदाराम दिगंबर हिलाळ (रा. गनशी, गणेशनगर, कवठे येमाई, ता. शिरूर) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन पिडीतेने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पीडिता गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तिच्या घराच्या पडवीत बसलेली होती. यावेळी अचानक संशयित हिलाळ शेडची कडी काढून तेथे घुसला. त्याने पिडीतेचा हात पडला. पिडीतेने विरोध केला असता तिला मिठी मारून घरात ओढत नेले. पिडीतेने आरडाओरड केल्यानंतर संशयित तेथून पळून गेला. जाताना त्याने कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी संशयित हिलाळ याच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे करीत आहेत.
शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग
शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…
शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार
शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…
शिरुर तालुक्यात महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार