रांजणगाव गणपती: ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर झोपली असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गावातील विजय पाचंगे मुलीजवळ गेला आणि त्याने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील अल्पवयीन मुलगी झोपली असताना आरोपी विजय पाचंगे हा मुलीच्या घरासमोर आला. त्याने मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून विनयभंग केला. यावेळी अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केली असता तिचे कुटुंबीय झोपतून जागे झाले. त्याचवेळी विजय हा तेथून पळून गेला.
घडलेल्या प्रकाराबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय बाळासाहेब पाचंगे (रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता काळे करत आहे.
निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…
शिरुर तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागापायी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केला ऍसिड हल्ला…
शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…