शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा परिसरात शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर झडप मारली. यावेळी बिबट्या व शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यामध्ये शेतकरी आनंद किसन फडतरे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आनंद फडतरे हे शेतात पिकांना पाणी देत होते. यावेळी शेजारील शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने आनंद फडतरे यांच्या अंगावर झडप मारली. यावेळी आनंद फडतरे यांनी आरडाओरडा करत बिबट्याशी झटापट केली. आनंद फडतरे यांनी जोरदार झटापट केल्यामुळे बिबट्या शेतात पळून गेला. यामध्ये आनंद फडतरे हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना मिळताच वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, चालक अभिजित सातपुते, शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली. शेतकऱ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी किरकोळ जखमी झाला असल्याने जखमी शेतकऱ्यावर कोरेगाव भीमा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांनी सांगितले.

दरम्यान, डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले.

शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

बापरे! शिरूर तालुक्यात बिबट्याची थेट शाळेच्या क्रीडांगणावरच एन्ट्री…

शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago