Shirur Police Station

शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनार आळी येथील कुमारी प्रतिक्षा वैभव शहाणे (वय २) ही मुलगी मैञीणीकडे जावून परत येते असे सांगून घरातून बाहेर गेली. पण, परत घरी आली नाही. तिचा शिरुर परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असून ती मिळून आली नाही.

सदरची मुलगी २३जून रोजी ०१ वा सोनार आळी येथील राहत्या घरातून मैत्रिणीकडे जावून येते असे सांगून ती निघून गेली आहे. तीन दिवस ऊलटूनही मुलगी घरी न आल्याने या बाबत मुलीची आई विद्या वैभव शहाणे यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिंदे हे करत आहे.

मिसींग व्यक्तीचे नाव व वर्णन…
कुमारी प्रतिक्षा वैभव शहाणे (वय २०, रा.सोनार आळी, शिरुर ता. शिरुर जि. पुणे), रंग -गोरा, उंची ५ फुट, अंगाने सडपातळ, केस- लांब सरळ, मानेवर फुलपाखरासारखे गोंदलेले, नेसणीस निळे रंगाची जिन्स पँन्ट, अंगात चाँकलेटी रंगाचा शर्ट व त्यावर श्रग, पायात काळे रंगाचे शायन्डेल अशा वर्णनाची मुलगी कोठे आढल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केले आहे.

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?

…अन्यथा चौकात शर्ट अंथरुण भीक मागुन आणखी पैसे देतो, सामाजिक कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल

शिरूर शहरात जुगार खेळणाऱ्यांवर ४ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकलेला फोटो शिरूर तालुक्यातील…

शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…