ramesh-thorat-shikrapur

शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येने उडाली खळबळ…

क्राईम

शिक्रापूर: शिक्रापूरचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

रमेश थोरात हे सकाळच्या सुमारास काळोखेवस्ती येथील विहिरीचे पाणी पाहून येतो, असे म्हणून घरातून मोटारीने (एमएच 12 एमयू 0052) गेले. काही वेळाने विहिरीच्या कडेला रमेश थोरात यांची कार व बाजूला चपला पडलेल्या दिसल्या. यामुळे शेजारील नागरिकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीमध्ये रमेश थोरात तरंगत असल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलिस हवालदार संदीप कारंडे, आत्माराम तळोले, मंगेश लांडगे, कृष्णा व्यवहारे, अतुल पखाले यांसह अनेक नागरिकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने थोरात यांना बाहेर काढत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे नेले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

दरम्यान, याबाबत रुपेश चंद्रकांत थोरात (वय 36, रा. इकोग्राम सोसायटी शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येची कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिक्रापूर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी