crime

शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून दोघांवर हल्ला; लोखंडी गज व विटेचा वापर…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी मध्ये जमीन मोजणीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात वडील–मुलासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिल पोपट भाईक (रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास आनंता भाईक (वय ५६, रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपी अनिल भाईक तेथे आला. फिर्यादी यांनी त्यांच्या गट क्रमांक 269 मधील सर्व्हे नंबरची खूण दाखवून, “तू हरी भाईक यांच्याकडून जमीन विकत घेतली आहेस, त्यांच्याकडून मोजणी करून घे,” असे समजावून सांगत असतानाच आरोपी संतापला. या संतापातून आरोपी अनिल भाईक याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने हरीदास भाईक यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गज डोक्यावरून सरकल्याने फिर्यादींच्या डाव्या खांद्यावर जोराचा वार बसला व खांद्याचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.

जखमीला उपचारासाठी कारमध्ये बसवून घेऊन जात असतानाही आरोपी रस्त्यात अडवा उभा राहिला आणि जखमींना रुग्णालयात जाऊ न देण्यासाठी अडथळा आणला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. आरोपीने हरीदास भाईक यांचे वडील आनंता हरी भाईक यांच्यावरही विट फेकून मारली, ती विट त्यांच्या उजव्या गुडघ्यावर लागून दुखापत झाली. त्यांनाही आरोपीने शिवीगाळ व धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबास जीविताचा धोका निर्माण झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हवा. अरुण उबाळे हे करीत आहेत. ग्रामीण भागातील वांरवार जमीन वादातून अशा घटना निर्माण होत आहे. झालेल्या या गंभीर हल्ल्याने स्थानिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

शिरुरमध्ये महिला पोलिस अधिकार्‍याच्या वर्तनावर संताप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार…

बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…

शिरुर! अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवीजवळ अपघात…

Video; रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील उज्जैन यात्रेच्या बसवर अज्ञातांकडुन दगडफेक

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…