क्राईम

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील ‘रविनंदा कॉयलाईट’ सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रचयिता अभिषेक गुप्ता (वय ३७) या उच्चशिक्षित विवाहितेने १६ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रचयिता या व्यवसायाने संगणक अभियंता होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींकडून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली जात होती. सुशिक्षित असूनही सासरकडून होत असलेल्या प्रचंड मानसिक दडपणाखाली त्या होत्या. अखेर, या सततच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विवाहितेनं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी वाघोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत रचयिता यांचा पती अभिषेक सुरेशचंद्र गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. अभिषेकसह कुटुंबातील इतर चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चशिक्षित कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक आहिरे करत आहेत.

दरम्यान, वाघोलीच्या घटनेच्या दिवशीच जवळच असलेल्या आव्हाळवाडी परिसरातही एका २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. प्रतीक्षा जयसिंग कदम असे तिचे नाव असून, सोन्याची अंगठी आणि गाडीचे हप्ते फेडण्यासाठी सासरच्यांकडून पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणी तिचा पती जयसिंग कदम याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाघोलीत 55 लाखांचा ड्रग्स साठा जप्त; राजस्थान कनेक्शन उघड, वर्षभरापासून तस्करी!

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

वाघोली येथील शाळेत शिपायाने केला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…

वाघोलीत समलैंगिक संबंधातून कोयत्याने वार करून युवकाची हत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

10 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago